मराठयांनो 1 डिसेंबरला जल्लोषाची तयारी करा : मुख्यमंत्र्यांचे सूचक व्यक्तव्य

0
67

अहमदनगर | मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातील अहवाल आज मागासवर्गीय आयोगाने सरकारकडे सोपवला. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 15 दिवसांत मराठा समाजाला आरक्षण देऊ असे म्हटले आहे. कायदेशीर प्रक्रिया पार पाडून मराठा समाजाला आरक्षण दिले जाणार आहे. ‘आंदोलन काय करता 1 डिसेंबरला जल्लोषाची तयारी करा’ असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. ते अहमदनगर येथे एका कार्यक्रमात बोलत होते.

मराठा समाज आरक्षणाची मागणी मागील अनेक वर्षापासून करत आहे. समितीने अहवालही सादर केला असून येत्या पंधरा दिवसांत मराठा समाजाला आरक्षण देऊ, असेही मुख्यमंत्र्यानी सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळणारच आहे. हे आरक्षण देताना इतर समाजाच्या आरक्षणाला मात्र धक्का लागणार नाही.