प्रतिक्षा संपली, अखेर मराठा आरक्षणाला विधिमंडळात एकमताने मंजूरी

0
20
fail photo

मुंबई : आज अखेर बहूप्रतिक्षित मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागलाय. मराठा आरक्षणांच विधेयक विधिमंडळात एकमताने मंजूर करण्यात आलंय. मजूंर करण्यात आलेल्या विधेयकानूसार मराठा समाजाला आता 16 टक्के अारक्षण मिळणार आहे. मात्र आता हे आरक्षण न्यायालयात टिकणार का? हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.

राज्यात मराठा समाजाची एकूण लोकसंख्या 31 टक्के असून, राज्य मागासवर्गीय आयोगाने केलेल्या शिफारनूसार मराठा समाजाला हे आक्षण देण्यात आलं आहे. या आरक्षणाचा मोठा फायदा समाजातील मागास घटकांना होणार असून, अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था वगळून, इतर शैक्षणिक संस्था आणि अनुदानित अथवा विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमधील एकूण जागांच्या १६ टक्के जागा आता मराठा समाजासाठी राखीव असणार आहेत. तसचं राज्याच्या नियंत्रणाखाली  असलेल्या लोकसेवा आयोगांच्या जागांसाठी देखील मराठा समाजाला हे आरक्षण लागू असणार आहे. मात्र केंद्रीय सेवांमध्ये मराठा समाजाला तूर्तास आरक्षण देण्यात आलेलं नाहीये.

गेल्य़ा अनेक दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाची मागणी करण्यात येतं होती. त्यासाठी मराठा समाजाकडून अनेकवेळा मोर्चे देखील काढण्यात आले. आज अखेर विधीमंडळाच्या दोन्हीही सभागृहात हे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आलं. आघाडी सरकारच्या काळात देखील राणे समितीची स्थापना करून मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत कायदा करण्यात आला होता. मात्र  हे आरक्षण त्यावेळी न्यायालयात टिकावं धरू शकलं नव्हतं. मात्र आता युती सरकारकडून देण्यात आलेलं हे आरक्षण तरी न्यायालयातं टिकणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

कृती अहवाल सादर : मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण!