कृती अहवाल सादर : मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण!

0
9

मुंबई | मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण मिळणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाविषयी दिलेल्या अहवालावनंतर आज मराठा आरक्षणासंदर्क्षातला कृती अहवाल (एटीआर) विधीमंडळात सादर केला आहे. यामध्ये शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे.

मराठा आरक्षणाचा प्रलंबित प्रश्न आज मार्गी लागतो का यावर सर्वांचे लक्ष आहे. न्या. गायकवाड यांच्या समितीने सादर केलेल्या मराठा आरक्षणावरचा कृती अहवाल आज विधानसभेत सादर करण्यात आला. या कृती अहवालात गायकवाड समितीच्या सर्व शिफारशी मंजूर करण्यात आल्या आहेत. मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्यात येणार असून ओबीसी आरक्षणाला धक्का लावण्यात आलेला नाही. असे या कृती अहवालात म्हटले आहे.