अल्‍पवयीन मुलासमोरच महिलेवर बलात्‍कार, आरोपी काही तासांतच जेरबंद

0
26

औरंगाबाद | महिलेच्‍या अल्‍पवयीन मुलासमोरच तिच्‍यावर बलात्‍कार करण्‍याच्‍या आरोपाखाली जवाहर नगर पोलिसांनी एकास अटक केली आहे. चरण प्रेमसिंग सुलावणे (25) असे आरोपीचे नाव आहे. पीडितेला अज्ञात स्‍थळी नेऊन दोन दिवस तिच्‍यासोबत दुष्‍कृत्‍य केल्‍याचा आरोप आरोपीवर आहे.

यासंबंधी पीडितेने दिलेल्‍या तक्रारीनूसार, त्‍या दिवाळीनिमित्‍त आपल्‍या मुलासह शहरात आल्‍या होत्‍या. एकेदिवशी आपल्‍या मुलासह हॉस्पिटलमध्‍ये जात असताना आरोपीने त्‍यांना आपल्‍या कारमध्‍ये लिफ्ट देऊ केली. आरोपीस लहानपणापासून ओळखत असल्‍यामुळे त्‍या कारमध्‍ये बसल्‍या. मात्र हॉस्पिटलमध्‍ये न नेता आरोपीने त्‍यांना अज्ञातस्‍थळी नेले. तेथे पाण्‍यामध्‍ये काहितरी मिसळून आरोपीने महिलेला बेशुद्ध केले व नंतर दोन दिवस तिच्‍यासोबत दुष्‍कृत्‍य केले.

हे सर्व करताना आरोपीने आपल्‍याला बेल्‍टने बांधले होते, असा आरोपही महिलेने केला आहे. दोन दिवस अत्‍याचार केल्‍यानंतर त्‍याने माझ्याकडून गळ्यातील साखळ्या व काही रक्‍कम हिसकावून घेतली व बुधवारी सकाळी आम्‍हाला मध्‍यवर्ती बसस्‍थानकावर सोडले. तसेच याविषयी कोणाला सांगितल्‍यास त्‍याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अधी धमकी आरोपीने दिली, असे पीडितेने आपल्‍या तक्रारीत म्‍हटले आहे.

यानंतर घरी आलेल्‍या पीडितेने घडलेल्‍या प्रकाराविषयी आपल्‍या पालकांना माहिती दिली व ताबडतोब जवाहर पोलिस स्‍टेशन गाठले. पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत वेगाने चक्रे फिरवली व अवघ्‍या काही तासांतच आरोपीला बेड्या ठोकल्‍या. आरोपीवर बलात्‍कार, अपहरण, विनयभंग याप्रकरणी गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. शुक्रवारी आरोपीला न्‍यायालयात हजर केले असता चौकशीसाठी 19 नोव्‍हेंबरपर्यंत त्‍याला पोलिस कोठडी सुनावण्‍यात आली आहे.