आयसीसी क्रमवारी जाहीर, कोहलीचे अव्वल स्थान कायम

0
11

नवी दिल्ली– टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरूद्ध सुरू होणाऱ्या चार कसोटी सामन्यांच्य़ा मालिकेपूर्वी फलंदाजी क्रमवारीत नबंरवन स्थानी अबाधित आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (अयसीसी) बुधवारी कसोटी क्रमवारी जाहीर केली.

विराट कोहलीने 935 गुणांसह अव्वलस्थान राखले. आता ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोची मालिकेत त्याचे रेटिंग आणखी वाढवण्याचा प्रयत्न तो करेल. फलंदाजी क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्हन स्मिथवर बंदी असल्याने कोहलीच्या नंबरवन सिंहासनेला कुठलाही धक्का नाही. तर न्यूझीलंडचा केन व्हिल्यमसन हा तिसऱ्या स्थानी अबाधित आहे.

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडाने आयसीसीच्य़ा कसोटी गोलंदाज क्रनवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थान काबीज केले आहे. त्याने इंग्लंडच्या जेम्स एन्डसनची जागा घेतली. एण्डरसन श्रीलंकेविरूद्धच्या अखेरच्या कसोटीत खेळला नव्हता. त्यामुळे त्याना 9 रेटिंग गुणांचा फटका बसला. तो रबाडा पेक्षा 8 गुणांनी मागे आला. पाकिस्तानच्या यासिर शहाने न्यूझीलंडविरूद्ध 14 बळी घेतल्याने त्याने 9 क्रमांकाने झेप घेत दहाव्या स्थानी पोहोचला. तर, रविंद्र जडेजा 5 व्या स्थनावर आहे.