कर्नाटकातील राजकीय समीकरणे बदलणार?; येडियुरप्पा, शिवकुुमार भेटीने तर्कवितर्कांना उधाण

0
7
बंगळुरू । कर्नाटकमध्ये सध्या सत्ता समीकरणे बदलण्याचे संकेत मिळत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी.एस. येडियुरप्पा आणि काँग्रेस नेते डी. के. शिवकुुमार यांच्या भेटीनं, राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलंय. सध्या काँग्रेसवर नाराज असलेले  शिवकुुमार हे भाजपला पांठिबा देणार असल्याची जोरदार चर्चा सुरूये. या भेटीवेळी शिवकुमार यांचे पुत्र खासदार बी. वाय. राघवेंद्र हे देखील उपस्थित होते.
डी.के. शिवकुमार यांच्या शिमोगा येथील निवासस्थानी  येडियुरप्पा आणि शिवकुमार यांच्यात सुमारे तासभर चर्चा झाली. तसेच येडियुरप्पा आणि शिवकुमार यांच्यात 20 मिनिटे बंद दाराआड चर्चा झाल्याचे वृत्त आहे. मात्र दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या शिमोगा येथील सिंचन प्रकल्पांबाबत चर्चा करण्यासाठी ही भेट झाल्याचे, पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आले.
दरम्यान कर्नाटकमध्ये सध्या भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. मात्र असे असून देखील, काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा दिल्याने, सध्या राज्यात काँग्रेस सत्तेत आहे. जेडीएसचे नेते कुमारस्वामी हे मुख्यमंत्री झाल्याने, अनेक काँग्रेस नेते पक्षावर नाराज आहेत. याचाच फायदा घेऊन, कर्नाटकात सत्ता स्थापन करण्याचे भाजपकडून प्रयत्न सुरू असल्याचं पुन्हा एकदा या दोन दिग्गज नेत्यांच्या  भेटीने समोर आलं आहे.