मुख्यमंत्र्यांनी बाहेर घोषणा केल्यापेक्षा सभागृहात मराठा आरक्षणाचे विधेयक आणावे – गणपतराव देशमुख

0
13

 

मुंबई | विधानसभेच्या हिवाळी आधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरवात आज सकाळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने झाली. आमदार अजित पवार, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि शेकापचे ज्येष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुख यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा सभागृहात लावुन धरत, सरकारला जाब विचारला आहे.  शेकापचे ज्येष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुख यांनी मुख्यमंत्र्यानी बाहेर घोषणा केल्यापेक्षा सभागृहात विधेयक आणावे अशी मागणी केली आहे.

ते पुढे म्हणाले ”माननीय मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल, असे वक्तव्य सभागृहाबाहेर केलं. पण, आरक्षणाचा अहवाल आला असून तो ताबडतोब सभागृहात ठेवावा. मुख्यमंत्र्यांनी बाहेर घोषणा करण्यापेक्षा या संबंधीचं विधेयक सभागृहात ठेवावं, याबाबत कुणाचही दुमत नाही. सध्याच्या कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं जाव.

मुख्यमंत्री बारामतीत आले असता धणगर आरक्षणाचा मुद्दा लवकर मार्गी लावला जाईल, असे म्हणाले होते. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचाही अहवाल आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजालाही लवकरात लवकर आरक्षण द्यावे, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे.