पुढच्या वर्षी देशभरातले 50% एटीएम बंद होणार?

0
11

कॉन्फेडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्रीने (सीएटीएमआय) जाहीर केलेल्या माहिती पुढच्या वर्षी देशभरातील 50% एटीएम बंद पडण्याची शक्यता आहे. भारतात तब्बल 2 लाख 38 हजार एटीएम कार्यरत आहेत. त्यापैकी अर्धे एटीएम पुढच्या वर्षी मार्च महिन्यात बंद पडणार असल्याची शक्यता आहे. यामधल्या एक लाख एटीएम बँकांच्या शाखांशी थेट संलग्न नाहीत. त्याला ऑफ साईट एटीएम म्हणतात. तर 15 हजार व्हाईट लेबल प्रकारातील एटीएम आहेत.

सीएटीएमआयच्या प्रवक्त्यांच्या म्हणण्यानुसार, “याचा सर्वात मोठा फटका ग्रामीण भागातील लोकांना बसणार आहे. प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत लोकांना ज्या सवलती मिळतात, त्यामधून मिळणारे पैसे ग्रामीण भागातील लोक एटीएमच्या सहाय्याने मिळवतात. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचे मोठे नुकसान होऊ शकतं. तसेच, एवढ्या मोठ्या संख्येनं एटीएम बंद झाले तर याचा परिणाम रोजगारावरही होईल. एटीएम बंद झाल्यामुळे त्याची देखभाल करणारे आणि इतर तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाऊ शकतात अशी भीतीही वर्तवली आहे.”

शहरांवर ही होईल परिणाम – जास्त करून एटीएमच्या एकूण संख्येपैकी १० टक्के एटीएम हे बंद असतात. त्यामुळे जर एटीएमची संख्या अजून कमी झाली तर त्यामुळे मोठी अडचण निर्माण होईल. ग्रामीण भागासह शहरातही एटीएम बाहेर रांगा लागतील.