‘जी 20’ परिषदेत ट्रम्प करणार भारत, जपानसोबत त्रिपक्षीय चर्चा

0
7

वॉशिंग्टन | या आठवड्यात होणाऱ्य़ा ‘जी 20’ परिषदेच्या वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे जपानचे पंतप्रधान शिन्झो अॅबे आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. यांच्यात त्रिपक्षीय चर्चा होणार आहे.

ही चर्चा अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस आयर्स येथे होणार आहे. यांच्यामध्ये काय चर्चा होणार याकडे सर्व देशांचे लक्ष लागून आहे.

तसेच या परिषदेवेळी ट्रम्प हे चीनचे अध्यक्ष जिनपिंग व रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्यासोबतदेखील चर्चा करणार आहे.