‘अयोध्या नव्हे, कर्जमाफी हवी’, दिल्लीत देशभरातील शेतकऱ्यांचा हुंकार

0
9

आंदोलनात एक लाख शेतकरी सहभागी

नवी दिल्ली | देशभरातील हजारो शेतकऱ्यांनी आज दिल्लीत धडक दिली आहे. कर्जमाफी द्या, शेतीच्या मालाला दिडपट हमीभाव द्या, स्वामीनाथन आयोग लागू करा. यासह अन्य मागण्यासाठी लहान मुलाबाळांसह शेतकरी आज संसदेला घेराव घालणार आहेत. ‘अयोध्या नव्हे, कर्जमाफी हवी’ असा नारा दिला आहे. 200 हून अधिक शतकरी संघटना यामध्ये सामिल झाल्या आहेत.

शेतकऱ्यांनी गुरुवारी रामलीला मैदानावर जवळपास 26 किलोमीटरचा मार्च काढला. यामध्ये बिहार, झारखंड, ओडिशा, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, हरियाणा, राजस्थान, तमिळनाडु, पश्चिम बंगाल, कर्नाटकसह जवळपास 5 हजार शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. शेतकऱ्यांच्या या प्रदर्शनामध्ये स्वराज इंडियाचे अध्यक्ष योगेंद्र यादव आणि मेधा पाटकर सामिल होत्या.