चेहऱ्याबरोबर मानही बनवा सुंदर, वापरा या खास टिप्स!

0
5
फाइल फोटो

चेहरा सुंदर दिसण्यासाठी अनेकजण स्वत: काळजी घेतात किंवा डॉक्टरचाही सल्ला घेतात. त्यानंतर हात आणि पायांचा विचार करतात. पण मानेकडे कोणी फारसे लक्ष देत नाही. जितकी चेहऱ्याची सुंदरता महत्त्वाची तितकीच मानेचीही असते. मानेचा रंग चेहऱ्यापेक्षा वेगळा दिसला तर विचित्र दिसते. त्यासाठी काही खास घरगुती टिप्स आहे. त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल.

दूध – दुधही आरोग्यासोबतच सौंदर्य वाढवण्यास मदत करते. मान फारच काळी दिसत असेल तर कच्च्या दुधाने मानेची स्वच्छता करा.

टोमॅटो – टोमॅटोचा रस आणि मध एकत्र करुन मानेवर लावा. हे लावल्यावर काही वेळ तसेच राहू द्या आणि मान स्वच्छ करा. फायदा होईल.

बेसन – बेसन जितके खाण्यासाठी फायदेशीर असते तितकचे ते त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठीही फायदेशीर असते. बेसनामुळे सहजपणे चेहऱ्यावरील मृत पेशी दूर केल्या जाऊ शकतात. यासाठी बेसनामध्ये थोडी हळद आणि गुलाबजल मिश्रित करा. हे चांगल्याप्रकारे एकत्र करुन मानेवर लावा आणि सुकल्यावर पाण्याने धुवा.

लिंबू – लिंबामध्ये व्हिटॅमिन सी हे तत्व असल्याने ते एका नैसर्गिक ब्लीचप्रमाणे काम करते. आंघोळ करण्याआधी लिंबू मानेवर हलक्या हाताने घासा. आठवड्यातून दोन-तिनदा लिंबाचा असा वापर केल्यास फायदा होईल.