दिवाळी विशेष –  ‘या’ शहरांमध्ये अशी साजरी केली जाते दिवाळी !

0
13

 

या दिवाळीत जर तुम्ही फिरण्यासाठी बाहेर जाण्याचा प्लॅन बनवत असाल तर आपल्या देशात काही असे शहर आहेत, जेथे दिवाळीच्या सणाची रोषनाई काही वेगळीच असते. तर मग चला जाणून घेउया अशा काही शहरांविषयी.

कोलकाता –  दिवाळीच्या सणाला आपल्याकडे लक्ष्मी मातेचे पुजन केल्या जाते. कोलकाता शहरात मात्र काली मातेचे पुजन केल्या जाते. दिवाळीच्या दिवशी कोलकात्यामध्ये काली मंदिरला भव्य अशा दिव्यांनी प्रकाशमान केल्या जाते. तर तुम्हीही या पुजेत भाग घेऊ शकता.

बनारस –  दिवाळीच्या दिवशी बनारस शहराला खुप सुंदर प्रकारे दिव्यांच्या प्रकाशाने सजवले जाते. येथे तुम्ही दिवाळीच्या दिवशी भव्य अशा गंगा आरतीचा आंनद घेऊ शकता.

उजैन –  माहाकालची नगरी उजैन येथील दिवाळी संपूर्ण देशात प्रसिध्द आहे. येथे तुम्ही माहकाल मंदिरात महापुजेचा आंनद घेत दिवाळी साजरी करू शकता.

अमृतसर –  पंजाबच्या अमृतसरमध्ये सुवर्ण मंदिराला खुप मोठ्या प्रमाणावर रोषनाई केली जाते. येथेही तुम्ही तुमची दिवाळी साजरी करू शकता.

हरिद्वार –  हिंदुच्या प्रमुख तिर्थक्षेत्रापैकी हरिद्वार हे एक तिर्थक्षेत्र आहे. दिवाळीच्या दिवशी येथे गंगा आरती नंतर घाटावरील पनत्यांची रोषनाई खुप छान असते.  येथे तुम्ही तुमची दिवाळी साजरी करू शकता.