दिवाळी: लक्ष्मी पूजेत करा या फुलांचा समावेश, मिळेल विशेष कृपा

0
7

दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी पुजेचे विशेष महत्त्व असते. मान्यतेनुसार घरामध्ये लक्ष्मी पूजन केल्यास बरकत राहते. लक्ष्मी पूजेमध्ये देवीच्या प्रिय वस्तूंचा समावेश केला तर हे अजूनच शुभ मानले जाते. या दिवशी विधीनुसार देवीची पूजा केल्याने देवीची कृपा अवश्य मिळते. आज आम्ही तुम्ला अशाच काही फुलांविषयी माहिती देणार आहोत, ज्या देवी लक्ष्मीला खुप प्रिय मानल्या जातात.

कमळ
कमळ हे लक्ष्मीच्या सर्वात आवडत्या फूलांपैकी एक आहे. कमळाच्या फूलावरच देवी विराजमान असते, यामुळे दिवाळीच्या पूजेच्या वेळी लक्ष्मीला कमलाचे फूल अर्पण करणे शुभ असते.

झेंडू
पिवळ्या रंगाचे फूल विष्णु देवाला खुप प्रिय मानले जाते. याच कारणामुळे फूल लक्ष्मीला प्रिय आहेत. दिवाळीच्या पूजेमध्ये लक्ष्मीसोबतच विष्णु देवाला झेंडूचे फूल अर्पण केले जाते.

लाल गुलाब
देवीला लाल रंगाचे वस्त्र आणि फूल अर्पण करणे शुभ मानले जाते. विशेषत: सौभाग्यवती स्त्रीयांनी पूजेच्या वेळी देवीला लाल गुलाब किंवा लाल रंगाचे कोणतेही फूल अर्पण करावे.

निळे जास्वंद
निळा रंग धनाचे प्रतीक मानला जातो आणि लक्ष्मी धनाची देवी आहे. यामुळेच लक्ष्मीच्या पूजेत निळ्या जास्वंदचा समावेश करावा.

पांढरे कन्हेर
लक्ष्मी धन- धान्यासोबतच सुख आणि शांततेचे प्रतीक आहे. यामुळेच देवीला पांढरे फूल अर्पण करणे शुभ असते. दिवाळीच्या पूजेमध्ये पांढऱ्या कन्हेरांचा समावेश अवश्य करा.