असा साजरा करतात ‘धनत्रयोदशी’चा दिवस !

0
22
या दिवशी कुटुंबातील मित्र परिवारातील सर्वांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली जाते.

 

दिवाळी विशेष – धनत्रयोदशी हा सण कार्तिक कृष्ण पक्षांच्या त्रयोदशी तारखेच्या दिवशी साजरा केला जातो. त्याचे नाव धनतेरस देखील आहे. कुटुंबातील मित्र परिवारातील सर्वांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली जाते.

दिवाळीचा सण यावर्षी 7 नोव्हेंबरला साजरा केला जाणार आहे. पण धनतेरसचा पवित्र सण दोन दिवस आधी साजरा केला जातो. हिंदू धर्मामध्ये त्याचे विशेष महत्व आहे. या उत्सवात माता लक्ष्मी, भगवान गणेश आणि धनवंतरी यांची पूजा केली जाते. यावेळी 5 नोव्हेंबर रोजी धनतेरस साजरे केले जात आहे. धनतेरस या दिवशी लोक दागिने व भांडी विकत घेतात.

कारण या दिवशी खरेदी केल्यास घरात सुख-समृद्धी नांदते अशी मान्यता आहे. अशीही मान्यता आहे की, धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं, चांदी आणि भांडी खरेदी केल्यास अधिक समृद्धी लाभते.