मुख्यमंत्र्यांच्या विरोधात  विखे पाटील दाखल करणार हक्कभंगाचा प्रस्ताव

0
27

मुंबई । येत्या अधिवेशनात आपन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार असल्याचं, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटंल आहे. मागासवर्गीय आयोगाच्या अहवालावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं वक्तव्य, हे सभागृहाचा हक्कभंग करणारं असल्याने, येत्या आधिवेशनात मुख्यंमंत्र्यांविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव अाणला जाईल असं  विखे पाटलांनी सांगीतलं.

सकल मराठा क्रांती मोर्चाचा आझाद मैदानातील आमरण उपोषणाचा आजचा 16 वा  दिवस असून, राधाकृष्ण विखे पाटिल यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलंत होते. ते म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबतचा मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सभागृहात सादर होण्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ‘आता आंदोलन करू नका, १ डिसेंबरला जल्लोष करा’, असं वक्तव्य केले आहे. मात्र मुख्यमंत्र्यांचे हे वक्तव्य सभागृृहाचा हक्क भंग करणारे असल्याने, त्यांच्याविरोधात येत्या आधिवेशनात हक्कभंगाचा प्रस्ताव आणला जाईल.

तसंच, अहवाल सादर करण्यापूर्वीच मागासवर्गीय आयोगाचे सदस्य डॉ. राजेश करपे यांनी अहवालाबाबत प्रसारमाध्यमांना मुलाखती दिल्या. हा देखील सभागृहाचा हक्कभंग असून, त्यांच्याविरोधातही हक्कभंगाचा प्रस्ताव आणला जाणार असल्याचंही विखे पाटील यावेळी म्हणाले.