देश सध्या अवघड परिस्थितीतुन जातोयं : प्रणब मुखर्जी

0
12

जगाला सहिष्णुतेची शिकवन देणारी भूमिच असहिष्णुतेच्या जाळ्यात  

नवी दिल्ली | माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जीनीं देशातील सध्याच्या परीस्थीतीवरून सरकारवर टिका केलीयं. ते म्हणाले देशात होत असलेल्या मानवाधिकारांचे हनन, वाढती असहिष्णूता तसेच देशातील जास्तीत जास्त पैसा श्रीमंतांच्याच खिशात जात असल्याने गरीब-श्रीमंतांची वाढलेली दरी यावरून त्यांनी सरकारप्रती नाराजी व्यक्त केली आहे.

नवी दिल्लीतील एका संमेलनात बोलतानां त्यांनी ही चितां व्यक्त केली आहे. ते म्हणाले ‘देश सध्या अवघड परिस्थीतीतुन जात आहे’. सरकारी संस्थावरील जनतेचा विश्वास कमी होत आहे. ज्या भूमीने वसुधैव कुटुंबकम आणि सहिष्णूतेचे धडे जगाला दिले आहेत. तिच भूमी आता असहिष्णुतेत वाढ, मानवाधिकारांचे उल्लंघन आणि दंगलींमुळे चर्चेत आहे. ही दुर्दवी बाबा असल्याचे ते म्हणाले.