दुष्काळाबाबत केंद्र व राज्य सरकार गंभीर नाही – शरद पवार

0
16

मुंबई – दुष्काळाबाबत केंद्र व राज्य सरकार गंभीर नसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलाय. राज्यातील दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक राज्यात आले होते. या संदर्भात पवार यांना प्रश्न विचारला असता ते बोलतं होते.

राज्यात गंभीर दुष्काळ आहे. मात्र राज्य सरकार म्हणावे तसं लक्ष देताना दिसतं नाहीये. दुष्काळाच्या पाहणीसाठी आलेले पथक रात्रीची पाहणी करत आहे. राज्य सरकार दुष्काळाबाबत हव्या त्या योजना करताना दिसत नसल्याची टिका यावेळी शरद पवार यांनी केलीये. 

 

                मुस्लिम समाजाला आरक्षण दिलेच पाहिजे – पवार 

मुस्लिम आरक्षण हे दिलेच पाहिजे. आज या देशामध्ये शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या अतिशय मागासलेले हे घटक आहेत. त्याच्यामध्ये मुस्लिमांसंबंधी विचार करावाच लागेल. पूर्वीच्या सरकारने आरक्षण देण्याच्या दृष्टीने निर्णय घेतला होता. कोर्टामध्ये त्या गोष्टीला मान्यता मिळाली, मात्र आज हे सरकार धर्माच्या आधारे देणार नाही असे बोलत आहे. धार्मिक आणि अन्य धार्मिकतेबाबत एक वेगळी भावना भाजप नेतृत्वाच्या मनात आहे. ही राष्ट्रीय ऐक्याला अनुकूल अशी भूमिका नाही आणि हा निर्णय अन्याय करणारा आहे. त्यामुळे येत्या काळात मुस्लिम, धनगर समाजाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.