मुख्यमंत्र्याच्या भेटीनंतर अनिल गोटेंचा राजीनाम्याचा निर्णय मागे?

0
9

मुंबई । धुळ्याचे भाजपचे आमदार अनिल गोटे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीने, अखेर गोटे यांच्या राजीनामा नाट्यावर पडदा पडला.आज हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची घोषणा अनिल गोटे यांनी केली होती. मात्र विधानभवनात दाखल होण्याआधीच त्यांनी मुख्यमंत्र्याची भेट घेतली. या भेटीनंतर गोंटेनी राजीनामा देणार असल्याचा आपला निर्णय मागे घेतला असल्याचं वृत्त आहे.

दरम्यान अनिल गोटे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात आज तब्बल साडेतीन तास चर्चा झाली. या चर्चेनंतर त्यांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला असल्याचं सागंण्यात येत आहे. मात्र त्याचबरोबर  गोटे यांनी पक्षात गुन्हेगारांना प्रवेश देणार नाही आणि दुसरं म्हणजे माझ्याच नेतृत्वात निवडणुका लढवल्या जाव्यात अशी मागणी देखील मुख्यमंत्र्याकडे केली आहे.

माहापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात भाजपच्या वतीनं आयोजीत करण्यात आलेल्या सभेमध्ये गोटे यांना बोलू न दिल्याने, ते पक्षावर नाराज होते. त्यांनी धुळ्याच्या महापौर पदावर दावा करत, आपन आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं म्हटलं होतं. तसेच त्यांनी भाजपच्या आमदांराना पत्र लिहून पक्षावर अनेक गंभीर आरोप केले होते. मात्र आज मुख्यमंत्र्याच्या भेटीने अनिल गोटे यांची नाराजी दूर झालीये. तसेचं त्यांनी आपला राजीनाम्याचा निर्णय देखील मागे घेतला असल्याची चर्चा राजकीय वर्तृळात होताना दिसतं आहे.