कुसूंळबे विभागाच्या जलवाहिनीतुन होतोय दूषीत पाणीपुरवठा;  साथीचे रोग पसरण्याची शक्यता

0
45
अलिबाग | कुसूंळबे विभागातील नागरीकांसाठीची जलवाहीनी फुटली. या जलवाहिनीत खारे पाणी जात असल्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्याता आहे. याप्रकरणी अलिबाग तालुका मनसे अध्यक्ष देवव्रत पाटील यांनी  सदर जलवाहिनीची दुरुस्ती लवकरात लवकर करण्यात यावी अशी मागणी पाणीपुरवठा अधिकारी प्रशांत म्हाञे यांच्याकडे केली आहे.
कुसूंबळे पाणी पुरवठा योजनेच्या पाण्याचा उपयोग हजारो नागरिक पिण्यासाठी करीत आहेत. मात्र काही वर्षांपूर्वी
ही मुख्य जलवाहिनी कातळपाडा येथील अरविंद पाटील यांच्या शेतात फुटलेल्याला अवस्थेत आहे. मात्र याबाबत अलिबाग पाणी पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार करून सुद्धा तक्रारीची दखल घेतली गेली नाही.  या फुटलेल्या जलवाहिनीतुन दररोज हजारो लिटर पाणी वाह्या जाते. त्यामुळे सर्व ठिकाणी पुरेशा प्रमाणात पाणी पोहचत नाही.  सध्या  या ठिकाणचा पाणी पुरवठा बंद केल्यानंतर या पाईप लाईनमध्ये खारे पाणी जाते व पुढच्या वेळी ते खारे पाणी लोकांपर्यत पोचते व हेच खारे पाणी लोकांना वापरावे लागते , त्यामुळे येथील लोक आजारी पडण्याचे प्रमाण देखील वाढलेल आहे.
देवव्रत पाटील यांनी गंभीर दखल घेत पाणी पुरवठा विभागाशी संपर्क करून सदर विषयी तात्काळ सर्व लिकेज काढण्याची मागणी केली. तसेच जिल्हा परिषदेचे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता वेंगुरलेकर , पाणीपुरवठा विभाग ,यांची भेट घेऊन त्यांना सदर प्रश्न गंभीर असुन त्यात लक्ष घालण्यासाठी विनंती केली . तसेच आपले अधिकारी हे त्यांच्या कामात कुचराई करत असल्याची तक्रार केली आहे. तसेच गेले ५ वर्ष रखडलेला कुसुंबळे पाणी फिल्टरेशन प्लॅन्ट विषयी माहिती घेऊन लवकरात लवकरच फिल्टर पाणी जनतेस उपलब्ध करावे अशीही मागणी केली. देवव्रत पाटील याच्या तक्रारी नंतर ३ छोटे लिकेज दुरूस्त करण्यात आलेत तर मोठे लिकेज काढण्यासाठी येत्या शुक्रवारी उरवरीत काम करण्यात येणार आहे .