मराठा बांधवांनो संघटनेमध्ये फुट पडू देऊ नका : अजित पवार 

0
9

मुंबई :  मराठा आरक्षणाचं विधेयक विधीमंडळात एकमताने मजूर झाल्यानंतर, राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानात आंदोलन करत असलेल्या मराठा मोर्चेकऱ्यांची भेट घेतली.सर्वांच्या लढ्यामुळे आरक्षणाची मागणी पूर्ण होतं आहे. आता संघटनेत फुट पडू देऊ नका असं यावेळी त्यांनी बोलताना म्हटलं.

दरम्यान विधिमंडळात मराठा आरक्षणाला मंजूरी मिळाल्यानंतर, आता हे आरक्षण न्यायालयात कसं टिकवता येईल?याकडे लक्ष केंद्रित कराव असं आवाहनही यावेळी अजित पवार यांनी केलं. यावेळी बोलताना ते म्हणाले की, तज्ज्ञ वकील देऊन याबाबतचा मायना तयार केला पाहिजे. मराठा समाजाला कोर्टात टिकेल असं आरक्षण मिळालं पाहीजे, त्यासाठी सरकारने योग्य ती कारवाई करावी.

प्रतिक्षा संपली, अखेर मराठा आरक्षणाला विधिमंडळात एकमताने मंजूरी