मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शिवशाही बस आणि 3 वाहनांचा विचित्र अपघात, 4 जखमी

0
52

रायगड (कर्जत) |

मुंबई पुणे द्रुतगतीमार्गावर सोमवारी पहाटे 3.45 च्या सुमारास शिवशाही बस व 2 वाहनांचा विचित्र अपघात झाला. कंटेनरला मागून शिवशाही बस व शिवशाही बसला पाठीमागून टेम्पोने धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नाही. मात्र 4 जण किरकोळ जखमी झालेे.

जखमींना येथील स्‍थानिक रूग्‍णालयात दाखल करण्‍यात आले आहे. दरम्‍यान, घटनास्‍थळी बचावकार्य सुरू असतनाच एक भरधाव लक्‍झरी बस या मार्गावर आली व तिचाही अपघात झाला. द्रुतगतीमार्गावरच्या मुंबई लेनवर हा विचित्र अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पेट्रोलिंग टीम, व डेल्टा फोर्स यांनी घटनास्‍थळी धाव घेतली व मदतकार्य सुरू करून थोड्याच वेळात वाहतुक सुरळीत केली.