अचानक सक्तीच्या रजेवर पाठवले, नोएडात 200 कर्मचाऱ्यांकडून मोबाईल कंपनीची तोडफोड

0
6

नोएडा– विनानोटीस सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याच्या रागावरून एएलसी मोबाईल कंपनीत कार्मचाऱ्यांकडून तोडफोड करण्यात आली आहे. यात जवळपास कंपनीचे 200 कर्मचारी सहभागी असल्याच समजलं जातयं. या तोडफोडीत कोणीही जखमी झाल नसून कंपनीच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. सध्या दिल्ली पोलिसांकडून या तोडफोडीची चौकशी सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नोएडातील सेक्टर-63 येथील ए ब्लॉकमध्ये हाईपैड टेक्नॉलजी प्राइवेट लिमिटेड एएलसी कंपनी आहे. हि कंपनी एमआई और ओप्पो सारखे मोबाईल बनवते. गेल्या काही महिन्यापासून कंपनी तोट्यात चालली होती. त्यामुळे काही दिवसांपूर्वूी कंपनी मॅनेजमेंटकडून त्यांच्या तीन हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आलं होत. गुरूवारी सकाळी देखील असाच काहीसा प्रकार घडला. कंपनीकडून 200 कर्मचाऱ्यांना कंपनीत प्रवेश नाकारण्यात आला होता. बुधवारी रात्री त्या सर्व कर्मचाऱ्यांना मोबाईलवर मेसेज करून कंपनीत न येण्याच सांगण्यात आलं होत. त्य़ावर गुरूवारी कंपनीत पोहेचताच कर्मचाऱ्यांनी कंपनीविरोधात घोषणाबाजी केली. त्यावर कंपनी मॅनेजमेंटकडून काही प्रतिसाद मिळत नसल्यानं कर्मचाऱ्यांचा आक्रोश वाढला. त्य़ांनी कंपनीवर दगडफेक करण्यास सुरूवात केली. त्यात बिल्डींगच्या काचा फुटल्या. प्रकरण हाताबाहेर जात असल्याच पाहून कंपनीने पोलिसांना पाचारण केले. त्य़ावर पोलिसांनी त्यांची कारवाई सुरू केली. तपासात कंपनी आणि कर्मचाऱ्यांमध्ये गैरसमज असल्याच समोर आलं.