‘ह्युंडाई’ची नवी Santro आज होणार लॉन्च, असे असेल फीचर्स

0
8

नवी दिल्ली- दिवाळीच्या निमित्ताने अनेक जण कार खरेदी कारतात. याच मुहूर्तावर ‘ह्युंडाई’ आपली नवीन कार बाजारात लॉन्च करणार आहे.अनेक दिवसांपासून बहुचर्चीत असलेली ‘ह्युंदई’ची नवीन सॅन्ट्रो कार आज लॉन्च केली जाणार आहे. 10 ऑक्टोबरपासून या कारसाठी ऑनलाइन बुकिंग सुरू झाली होती. नवी दिल्लीत एका कार्यक्रमात ही कार लॉन्च केली जाणार आहे.

अधिकृतपणे या कारची किंमत अद्याप समोर आली नाही, मात्र 3.87 लाख रुपयांपासून पुढे असण्याची शक्यता आहे. लॉन्चिंगवेळी या कारची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

असे असेल कारचे फीचर्स
कारमध्ये १.१ लीटरचे पेट्रोल इंजिन असेल.
६९ पीएसची पॉवर आणि ९९ Nm चा टॉर्क असेल.
कार ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसोबत बाजारात येईल.
पेट्रोल इंजिनशिवाय कार सीएनजी व्हेरिएन्टमध्येही उपलब्ध असेल.
सीएनजी व्हेरिएन्टसोबत हे इंजिन असेल परंतु, त्याची पॉवर कमी होईल.
सीएनजीसोबत इंजिन पॉवर ५९ पीएस असेल.