संगीतातला ‘देवमाणूस’ हरपला !

0
12

काही बोलायचे आहे पण बोलणार नाही

मुंबई – जेष्ट कवी, गायक, संगीतकार असलेले ‘यशवंत देव’ यांचे आज ऩिधन झाले. ते 92 वर्षाचे होते. दीर्घ आजारामुळे त्यांनी दादरच्या सुश्रुषा रुग्णालयात सोमवारी रात्री 1:30च्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या देव यांच्यावर दादर येथील शुश्रूषा रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सायंकाळी 4 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील. आपल्या लेखनकौशल्य आणि संगीत दिग्दर्शनाने अनेक वर्ष त्यांनी संगीतक्षेत्रावर अधिराज्य गाजविले.

बालपण : – यशवंत देवांचा जन्म १ नोव्हेंबर १९२६ सालचा. त्यांच्या घरात वडिलांच्या रूपातच गाणे होते. तेच त्यांचे पहिले गुरू. देवांचे वडील विविध वाद्ये वाजवण्यात पटाईत होते पण त्यांतही तबल्यावर त्यांचे जास्त प्रेम होते. त्यांच्याचकडून देवांना तालाचे बाळकडू मिळाले. जी.एन. जोशी  आणि गजाननराव वाटवे  ह्यांच्या शब्दप्रधान गायकीमुळेच यशवंत देव सुगम संगीताकडे वळले.

कारकीर्द : –  आपल्या वडिलांकडून मिळालेला संगीतसाधनेचा वारसा यशवंत देव यांनी समर्थपणे पुढे नेला. आकाशवाणीवर सुगम संगीत विभागात सतारवादक म्हणून त्यांनी कारकीर्द सुरू केली. मुंबई आकाशवाणी केंद्रावर त्यांनी सादर केलेला ‘ भावसरगम ’ हा कार्यक्रम चांगलाच गाजला. त्या द्वारेच, संगीतकार, गायक आणि कवी ही त्यांची ओळख महाराष्ट्राला झाली. शब्दप्रधान गायकीचे उद्गाते, अशी त्यांनी स्वतःची प्रतिमा निर्माण केली. आचार्य रजनीश यांच्या लेखनाचा त्यांनी केलेला भावानुवादही रसिकांना आवडला.

यशवंत देव यांनी लिहलेले काही निवडक गाणी : –

  • जीवनात ही घडी अशीच राहू दे
  • अशी धरा असे गगन कधी दिसेल का?
  • अशी ही दोन फुलांची कथा, एक शिवाच्या पदी शोभते एक शवाच्या माथा
  • आयुष्यात खूप चौकटी पाहिल्या
  • करिते जीवनाची भैरवी
  • कामापुरता मामा
  • कोटि कोटि रूपे तूझी कोटी सूर्य चंद्र तारे
  • कृष्णा उडवू नको रंग
  • तुझ्या एका हाकेसाठी
  • तू नजरेने हो म्हटले पण वाचेने वदणार कधी
  • तेच स्वप्‍न लोचनांत
  • दत्तगुरूंचे दर्शन घडले
  • दिवाळी येणार अंगण सजणार
  • नीज रे नीज रे बाळा
  • प्रिया आज माझी नसे साथ द्याया
  • प्रिया साहवेना आता

 

यशवंत देव यांनी संगीत दिलेली काही निवडक गाणी : –

  • अखेरचे येतिल माझ्या
  • अपुल्या हाती नसते काही
  • अंबरात नाजुकशी
  • अरे देवा तुझी मुले अशी
  • अर्धीच रात्र वेडी
  • अशी धरा असे गगन
  • अशी पाखरे येती आणिक
  • असेन मी नसेन मी
  • आज राणी पूर्विची ती
  • आम्हींं जावें कवण्या
  • आळवितां धांव घाली
  • एवढेतरी करून जा
  • करिते जीवनाची भैरवी
  • कामापुरता मामा

यशवंत देवांनी कैक हिंदी, मराठी चित्रपटांना संगीत दिले आहे. तसेच बावनखणी, चारचौघी, सख्खे शेजारी, घनश्याम नयनी आला अशासारख्या जवळपास ३०-४० नाटकांचेही त्यांनी संगीतदिग्दर्शन त्यांनी केले होते. ग.दि. माडगुळकरांचे गीतरामायण जसे सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केले, तसे माडगुळकरांच्या सचिन शंकर बॅले ग्रुपने सादर केलेल्या “कथा ही रामजानकीची” या नृत्यनाटिकेला यशवंत देव यांनी संगीत दिले होते.