राम मंदिराच्या उभारणीसाठी रायगड जिल्हयातून अयोध्याला शिवसैनिक रवाना

0
9

म्हसळा | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी अयोध्यानगरी सज्ज झाली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून असंख्य शिवसैनिक, शिवसेनाप्रेमी, रामभक्त अयोध्येत दाखल होत आहे. शिवसेना पक्षप्रमुखांच्या आदेशाने रायगड जिल्ह्यातूनही तिनशे शिवसैनिक अयोध्येत रवाना झाले आहे. अशी माहिती जिल्हाप्रमुख रवी मुंढे यांनी दिली.

शिवछत्रपतींच्या जन्मभूमीतील माती घेऊन ‘पहले मंदिर फिर सरकार’ अशा घोषणा देत शेकडोच्या संख्येने शिवसैनिक अयोध्येत रवाना झाले आहेत. मात्र काही शिवसैनिकांना रेल्वेचे तिकीट न मिळाल्यामुळे अयोध्येत जाता आले नाही. अशा शिवसैनिकांना म्हसळा शहरातील राममंदिरामध्ये महाआरतीचे आयोजन केले असल्याची माहीती शहर प्रमुख मुन्ना पानसरे यांनी दिली आहे.