राजस्थानात भाजप प्रचारासाठी ‘जेठालाल’, या उमेदवारासाठी मागत आहे मतं

0
9

राजस्थान | चर्चित टीव्ही चॅनलवरील ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम जेठालाल राजस्थान विधानसभा निवडणूकीमध्ये प्रचार करताना दिसले. मालिकेमध्ये ‘जेठालाल चंपकलाल गडा’ नावाने प्रसिद्ध दिलीप जोशी सध्या भाजपचा जोरदार प्रचार करत आहे.

राजस्थानच्या चितौडगढ जिल्ह्यातील सादरी विधानसभा येथे भारतीय जनता पक्षाकडून ललित ओसवाल हे उमेदवार आहे. त्यांच्या प्रचारासाठी जेठालाल यांना बोलावले आहे.

गुरुवारी दिलीप जोशी चितौडगढमध्ये रोड शो करताना दिसले. जेव्हा पत्रकारांनी त्यांना राहुल गांधी यांच्याबद्दल विचारले तेव्हा ते म्हणाले ‘मी फक्त एवढेच म्हणू शकतो की, माझ्यापेक्षा जास्त हास्य कलाकार तर ते आहे.’

राजस्थान विधानसभेच्या 200 जागेंसाठी 7 डिंसेबरला मतदान होणार आहे. तर निकाल 11 डिसेंबरला लागणार आहे.

दरम्यान, दिलीप जोशी यांनी ‘हम आपके है कौन’ आणि मैंने प्यार किया’ या बॉलीवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. दिलीप जोशी यांनी मागील लोकसभा निवडणूकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठीही प्रचार केला होता.