# मी टू वादळ : महिलांनो खोटे आरोप करु नका: हुमा कुरेशी

0
16

‘मी टू’ ही एक महत्त्वाची मोहीम असून खोटे आरोप करुन या मोहीमेचा मार्ग भरकटवू नका, असे आवाहन या अभिनेत्रींनी केले

मनोरंजन, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रातील महिला सहकाऱ्यांशी लैंगिक गैरवर्तनाच्या अनेक घटनांना सध्या ‘मी टू’ (#MeToo) मोहिमेच्या निमित्ताने वाचा फुटत असतानाच अभिनेत्री हुमा कुरेशी आणि संध्या मृदूल यांनी महिलांना आवाहन केले आहे. महिलांनी खोटी तक्रार किंवा आरोप करु नये. बदला घेण्यासाठी असे आरोप करु नका. ‘मी टू’ ही एक महत्त्वाची मोहीम असून खोटे आरोप करुन या मोहीमेचा मार्ग भरकटवू नका, असे आवाहन या अभिनेत्रींनी केले आहे.
तनुश्री दत्ताने ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकर यांनी असभ्य वर्तन केल्याची तक्रार करून अन्यायाला वाचा फोडल्यानंतर बॉलीवूड आणि प्रसारमाध्यमांतील अनेक महिला अन्यायाची व्यथा सोशल मीडियावर मांडत आहेत. या पार्श्वभूमीवर अभिनेत्री हुमा कुरेशी आणि संध्या मृदूल यांनी सोशल मीडियावरुन महिला वर्गाला आवाहन केले.

हुमा कुरेशी ट्विटमध्ये म्हणते, सर्व महिलांना आवाहन, कृपया खोट्या तक्रारी किंवा आरोप करु नका. या महत्त्वपूर्ण मोहीमेचा मार्ग भरकटवू नका. ही अत्यंत महत्त्वपूर्ण मोहीम आहे. फक्त सत्य जनतेसमोर आणा. तुमच्या वैयक्तिक स्वार्थापायी खोटी तक्रार करुन चांगल्या मोहीमेचे खच्चीकरण करु नका, असे तिने म्हटले आहे.