# मी टू : तो मी नव्हेच; आलोक नाथ यांचे स्पष्टीकरण

0
9

बलात्काराचा आरोप फेटाळला

ज्येष्ठ अभिनेते आलोक नाथ यांनी त्यांच्यावर केलेला बलात्काराचा आरोप फेटाळला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शिका-निर्मात्या विनता नंदा यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. ‘मी हे आरोप नाकारत नाही आणि स्वीकारतही नाही. ती घटना (बलात्कार) घडली असावी, पण कोणा दुसऱ्या व्यक्तीने तो केला असावा. मी या विषयावर अधिक बोलणार नाही कारण तितकाच तो ताणला जाईल,’ असं आलोक नाथ एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.