# मी टू चे वादळ क्रिकेटमध्ये; CEO राहुल जोहरी यांच्यावर आरोप

0
9

एका आठवड्यात स्पष्टीकरण द्या; प्रशासकीय समितीचे राहुल जोहरींना आदेश

गेल्या काही दिवसांपासून #MeTooची सर्वत्र चर्चा सुरु आहे. बॉलिवूडमधील काही जुनी प्रकरणे यामुळे पुढे आली आहेत. मागच्या आठवड्याभरात हे वादळ क्रिकेट विश्वात आले होते. पण भारतीय क्रिकेट यापासून दूर होते. परंतु आता भारतीय क्रिकेटमध्येही #MeTooच्या वादळाने शिरकाव केला आहे. BCCIचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) राहुल जोहरी यांच्यावर महिला पत्रकाराने लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत.
#MeToo या मोहिमेअंतर्गत या आठवड्यात श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू अर्जुना रणतुंगा आणि वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा यांच्यावर अत्याचाराचे आरोप करण्यात आले होते. त्यानंतर आता BCCI चे CEO राहुल जोहरी यांच्यावर असे आरोप करण्यात आले आहेत. मात्र हे आरोप करणाऱ्या महिलेने तिची ओळख उघड केलेली नाही.

@PedestrianPoet या ट्विटर अकाऊंटवरून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये ‘मीडिया क्षेत्रातील काही बड्या लोकांच्या नावांचा समावेश असलेले इ-मेल माझ्याकडे आहेत. पण पीडित महिलेने सगळ्यांची नावे न घेण्याची विनंती केली आहे. राहुल जोहरी. तुमची वेळ संपली. #MeToo’ अशी पोस्ट केली आहे.
BCCI चे CEO म्हणून पदभार स्वीकारण्याआधी ते Discovery Network Asia Pacificचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि महाव्यवस्थापक (साऊथ एशिया) म्हणून काम पहात होते. एप्रिल २०१६मध्ये ते BCCI मध्ये कार्यरत झाले.