मराठ्यांना आरक्षण मिळू शकतं तर पटीदारांना का नाही? हार्दिक पटेलचा गुजरात सरकारला सवाल

0
5

मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं तर पाटीदार समाजाला का नाही? असा प्रश्न पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलने उपस्थित केलाय. गुरुवारी महाराष्ट्र सरकारनं मराठा समाजाला नोकरीत आणि शिक्षणात 16 टक्के आरक्षण दिलं. त्यानंतर हार्दिकने पत्रकारांशी बोलताना हे मत व्यक्त केलंय.

ज्याप्रमाणे महाराष्ट्रातील भाजप सरकारनं मराठा समाजाचं आर्थिक आणि सामाजिक स्थितीचं सर्वेक्षण केलं, त्याचप्रमाणे गुजरातमध्ये पाटीदार समाजाचं सर्वेक्षण करावं, अशी मागणी हार्दीकने केलीय. असं सर्वेक्षण केल्यास पाटीदार समाज सामाजिक आणि आर्थिक मागास असल्याचं सिद्ध होईल, असं देखील हार्दिक पत्रकारांशी बोलताना म्हणाला.

गुजरातमध्ये पाटीदार समाजाच्या आरक्षणासाठी काम करणाऱ्या पाटीदार अनामत समितीने मंगळवारी गुजरात ओबीसी आयोगाच्या सुनाबेन भट यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील मराठा समाजप्रमाणे पाटीदार समाजाचं देखील सर्वेक्षण करण्यात यावं, अशी मागणी केली.