फ्लिपकार्ट, अॅमेझॉनमध्ये नोकऱ्यांचा पाऊस पण….

0
14

तात्पुरत्या स्वरूपाच्या १ लाख २० हजार नोकऱ्या?

 

नवी दिल्ली । ई-कॉमर्स क्षेत्रातील अॅमेझॉन इंडिया आणि फ्लिपकार्ट या बड्या कंपन्यांमध्ये लवकरच मेगा भरती होणार आहे. दिवाळीत ग्राहकांच्या वाढत्या मागणीची पूर्तर्ता करण्यासाठी या दोन्ही कंपन्यांकडून तब्बल १ लाख २० हजार नव्या तात्पुरत्या स्वरुपाच्या नोकऱ्या उपलब्ध केल्या जाऊ शकतात. नोकरदार कंपन्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार यंदा सणासुदीच्या काळात उपलब्ध होणाऱ्या तात्पुरत्या नोकऱ्यांमध्ये दुपटीने वाढ होण्याची शक्यता आहे.

ऑनलाइन वस्तुंच्या खरेदीत झालेली लक्षणीय वाढ पाहता यंदा दोन लाख अतिरिक्त कर्मचाऱ्यांची गरज निर्माण होईल, असं काही जाणकारांचं म्हणणं आहे.

फ्लिपकार्टने यंदा खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी तगड्या ऑफर्ससोबतच लॉजिस्टिक आणि डिलिव्हरी सेवेतही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. घरपोच सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची मोठी फौज तयार करण्यावर कंपनीने भर दिला आहे. फ्लिपकार्टचं हे पाऊल ओळखून अॅमेझॉननंही ग्राहक सुविधेवर लक्ष केंद्रीत करण्यास सुरूवात केली आहे. फ्लिपकार्टमध्ये वॉलमार्टनं केलेल्या गुंतवणुकीनंतर मोठा बदल झाल्याचं सांगण्यात येत आहे.