#MeToo : नवाझुद्दीनने बळजबरी मिठी मारली… अभिनेत्री निहारिका सिंहचा आरोप

0
20

मुंबई | बॉलिवूडमधील सध्याचा आघाडीचा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी ‘#MeToo’ मोहिमेच्या जाळ्यात अडकला आहे. प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री निहारिका सिंहने नवाजुद्दीनवर आरोप केले आहेत. पत्रकार संध्या मेनन हिने एकामागून-एक ट्विट करून या प्रकरणाला वाचा फोडली आहे.

माजी मिस इंडिया निहारिका सिंहने आपल्यावर बेतलेल्या प्रसंगाबाबत सविस्तर लिहीले आहे. ‘मिस लवली’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान नवाजुद्दीनसोबत भेट झाली होती. नवाजुद्दीनबद्दल तिने सांगितले की, एकदा नवाज पूर्ण रात्रभर शूटींग करत होता. त्यानंतर सकाळी मेसेज करुन त्याने मी तुझ्या घराजवळ असल्याचे सांगितले. मी त्याला नाश्ता करण्यासाठी घरी आमंत्रित केले. जेव्हा मी घराचा दरवाजा उघडला तेव्हा नवाजने बळजबरी मला मिठी मारली. मी त्याला दूर सारण्याचा प्रयत्न केला. मात्र, माझा विरोध तोकडा पडला. मला नवाजसोबत संबंध ठेवण्याची इच्छा नव्हती असेही निहारिकाने म्हटले.

पत्रकार संध्या मेनन यांना दिलेल्या माहितीत नहारिकाने नवाजुद्दीन सिद्दीकीसह भूषण कुमार आणि साजिद खानवर देखील आरोप केले आहेत. बॉलिवूडमध्ये स्ट्रगलच्या दिवसात भूषण कुमार आणि साजिद खान यांनी चित्रपटात काम करण्याच्या बदल्यात शरीर संबंध ठेवण्याची मागणी केली असल्याचा आरोप तिने केला.

नवाजुद्दीनचे अनेक महिलांसोबत संबंध होते, हे मला उशारा समजले, असे देखील निहारिकाने सांगितले. नवाजने एका महिलेसोबत लग्न केले असून त्याच्यावर हुंडा मागितल्याचा आरोप होता. एकदा एका महिलेने फोन करुन भांडण केले. या घटनेनंतर आपण नवाजसोबतचे संबंध संपुष्टात आणले असल्याचे निहारिकाने सांगितले.