जऴगावचे माजी खासदार ‘वाय. जी. महाजन’सर यांचे निधन

0
24

जळगाव – जळगाव जिल्ह्याचें सुपूत्र माजी खासदार यशवंत गिरधर महाजन यांचा आज दिर्घ आजाराने मृत्यू झाला. ते 79 वर्षाचे होते.
पुणे विद्यापीठातून बी.एड. केलेले महाजन सर हे व्यवसायाने शिक्षक होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणीक प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी नशिराबाद येथ शिक्षण संस्थाही सुरु केली होती.
आपल्या राजकीय कार्कीदीला त्यांनी भारतीय जनता पार्टी या पक्षातुन सुरवात केली होती. तसेच ते भारतीय जनता पक्षाकडून जळगांव लोकसभा मतदारसंघातून 1999 मध्ये आणि 2004 मध्ये लोकसभेवर निवडून गेले होते.

मागील काही दिवसांपूर्वी महाजन यांची प्रकृती खालावली होती. मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. अखेर एका बहूआयामी व्यक्तिमत्वाची आज प्राणजोत मालवली. सायंकाळी साडेपाच वाजता नशिराबाद येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्‍यात येणार आहेत.