‘गंगाधर ही शक्तिमान है’, राज ठाकरे आणि शरद पवारांना भाजपचा टोला

मुंबई | लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. राज ठाकरे आघाडीच्या प्रचारसभा घेत आहे. राज ठाकरेंकडून भाजप विरोधात तुफान फटकेबाजी केली जात आहे. सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोलापुरात सभा घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी भाजपला चांगलेच झोडपून काढले. यानंतर राज ठाकरे आणि शरद पवार एका हॉटेलमध्ये मुक्कामाला थांबले असे वृत्त होते. या वृत्तावरुनच भाजपने या दोघांना टोला लगावला आहे. ‘गंगाधर ही शक्तिमान है’ तसेच ‘कर्ता’ आणि ‘करविता’ यांनी एकत्र येणे अगदीच स्वाभाविक आहे. असा टोलाही भाजपने ट्विटच्या माध्यमातून लगावला आहे.

‘कर्ता’ आणि ‘करविता’ म्हणजेच शरद पवार आणि राज ठाकरे यांनी एकत्र येणे अगदीच स्वाभाविक आहे असा टोला भाजपने लगावला आहे. तसेच “गंगाधर ही शक्तिमान है” हे अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे, असा चिमटा भाजपने काढला आहे. म्हणजे शरद पवार राज ठाकरेंचे करविता आहेत असे भाजपने म्हटले आहे. राज ठाकरे हे पवारांच्या इशाऱ्यावर बोलत आहेत असे अप्रत्यक्षरित्या भाजपने म्हटले आहे.

सोमवारी सोलापूरची सभा संपल्यानंतर राज ठाकरे हे सोलापुरातील बालाजी सरोवर हॉटेलमध्ये पोहोचले. यानंतर शरद पवारही उस्मानाबाद येथील सभा संपवून सोलापुरातील बाजाली हॉटेलमध्ये पोहोचले होते. प्रसारमाध्यमांमध्ये या दोघांच्या भेटीचे वृत्त येताच भाजपने अशी एक बातमी शेअर करत ट्विट केले. मंगळवारी सकाळी भाजपने राज ठाकरे आणि शरद पवारांविषयी ट्विट करुन चिमटा काढला आहे.

असे आहे ट्विट

‘कर्ता’ आणि ‘करविता’ यांनी एकत्र येणे अगदीच स्वाभाविक आहे.
कारण “गंगाधर ही शक्तिमान है” हे अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे.
#आघाडी_बिघाडी
@PawarSpeaks @RajThackeray