धुळ्याच्या महापौरपदी चंद्रकांत सोनार विजयी

धुळे | धुळे महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे चंद्रकांत सोनार तर, उपमहापौरपदी कल्याणी अंपळकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. महापालिका निवडणुकीत भाजपने 74 जागांपैकी 50 जागांवर विजय मिळवला. त्यामुळे धुळ्यात भाजपची एकहाती सत्ता आली आहे. दरम्यान, महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार मंगला चौधरी यांनी अर्ज मागे घेतला. चौधरी यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे चंद्रकांत सोनार यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाली.