Birthday Special : अशा घडल्या मेधा पाटकर

बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या धनी असलेल्या मेधाताईंचा आज जन्मदिवस. त्या 64 वर्षाच्या झाल्या. 

मेधा पाटकरांचा जन्म १ डिसेंबर १९५४ रोजी मुंबई येथे झाला. त्यांचे वडील वसंत खानोलकर हे स्वातंत्र्य चळवळीतले अग्रगण्य लढवय्ये सैनिक आणि अनुभवी, प्रसिध्द कामगार संघटक. त्यांनी पुढे ‘प्रजा समाजवादी पक्ष’ कार्यरत केला. मेधाताईंच्या आई इंदू खानोलकर हे एक प्रसन्न व्यक्तिमत्व. त्या नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रत्येक प्रसंगात न चुकता यायच्या.

मेधा पटकारांना सर्वसामान्य जनांची सेवा करायला डॉक्टर व्हायचे होते. पण दुर्दैवाने, थोडया मार्कांच्या कमतरतेमुळे त्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकला नाही. पण त्या निराश झाल्या नाहीत. असामान्य माणसे आपल्या आयुष्याला स्वत:हून कलाटणी देतात. मेधानीही तेच केले. त्यांनी ‘समाजकार्य’ हे डोळयांसमोर ठेवलेले ध्येय ढळू दिले नाही. त्यांनी सामाजिक कार्य हा विषय घेऊन टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशँलिअल्ट सायन्स येथून एम. ए. केले त्यानंतर त्यांनी सेवाभावी संघटनांमधून मुंबईच्या झोपडपट्टयांमध्ये पाच वर्ष कार्य केले. तसेच, गुजरातच्या नैॠत्य भागात मागासलेल्या जमातींमध्ये दोन वर्षे काम केले.

‘मेधा पाटकर म्हणजे नर्मदा बचाव आंदोलन’ असे समीकरणच आहे. शिवाय, त्या मुंबईत ‘स्वाधार’ नावाची महिलांची संघटनाही चालवतात. 

मेधा पाटकर यांनी मध्यप्रदेश आणि गुजरातमध्ये ‘नर्मदा बचाव आंदोलन’ संघटित केले. ‘नर्मदा खोरे विकास प्रकल्प’, ‘सरदार सरोवर धरणां’ मुळे निर्वासित होणा-या लाखो लोकांचे पुनर्वसन आणि नर्मदा नदीवर बांधल्या जाणा-या मोठया धरणांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर ‘नर्मदा बचाव आंदोलना’ ने कार्य करण्यास सुरुवात केली. या आंदोलनासामध्ये त्यांना मोठ्याप्रमाणावर जनतेची साथ लाभली. जनसामान्यांवर होणाऱ्या अंत्याचाराविरूध्द लढायला सैदव तत्पर असतात.