पुन्हा अडचणीत सापडले राहुल गांधी, सुशील कुमार मोदी दाखल करणार मानहानीचा दावा

नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. ‘चौकीदार ही चोर है’ या वक्तव्यानंतर सुप्रीम कोर्टाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीना नोटीस बजावली. यानंतर आता सुशील कुमार मोदी राहुल गांधींविरोधात मानहानीचा दावा दाखल करणार आहेत. ‘सारे मोदी चोर है’ असे राहुल गांधी 13 एप्रिल रोजी बोलले होते. यामुळेत आता ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

राफेल प्रकरणी राहुल गांधी मोदींवर नेहमी टीका करत असतात. यावेळी ते नरेंद्र मोदी चोर आहेत असे अनेक वेळा म्हणतात. नीरव मोदी, ललित मोदी आणि नरेंद्र मोदी हे सर्वच चोर आहेत असेही ते म्हणतात. यावरुनच त्यांनी सर्व मोदी चोर आहेत असे वक्तव्य केले होते. मात्र आता असे म्हणणे त्यांना महागात पडले आहे. सुशील कुमार मोदी राहुल गांधीविरोधात मानहानिचा दावा दाखल करणार आहेत. मोदी हे बिहारचे उपमुख्यमंत्री आहेत.

बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी म्हणतात की, ‘सर्व मोदी चोर असल्याचे राहुल गांधी म्हणाले. मी पटनामध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करणार आहे. मोदी हे अडनाव असणे गुन्हा आहे का? ते कोट्यावधी लोकांना चोर म्हटले आहेत, त्यांनी त्यांच्या भावना दुखावल्या आहेत’ असा आरोप सुशील कुमार मोदी यांनी केला आहे.

सुप्रीम कोर्टाने बजावली होती नोटीस

भारतीय जनता पक्षाच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी सुप्रीम कोर्टात राहुल गांधींविरुद्ध अवमान याचिका दाखल केली होती. सुप्रीम कोर्टाने राफेल डीलसंबंधी निर्णयावर पुनर्विचार याचिका मंजूर केली होती. राफेल डीलमध्ये ‘चौकीदार मोदी चोर हैं’ असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे. असे राहुल गांधी म्हणाले होते. याच वक्तव्याविषयी भाजप खासदार मीनाक्षी लेखी सुप्रीम कोर्टात पोहोचल्या होत्या. त्यांनी कोर्टाच्या अवमानाचा आरोप लावला होता. यानंतर कोर्टाने राहुल गांधी यांना नोटीस बजावली होती. आता राहुल गांधी पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे.