दीपिका कक्कर इब्राहिम ठरली ‘बिग बॉस 12’ची विजेती 

मुंबई | टीव्ही मालिका ‘ससुराल सिमर का’ फेम अॅक्ट्रेस दीपिका कक्कर इब्राहिम ‘बिग बॉस सीझन 12’ ची विजेती ठरली आहे. अंतिम फेरीत क्रिकेटर श्रीशांत आणि दीपक ठाकुर यांना धोबीपछाड देत दीपिकाने ट्रॉफी आपल्या नावावर केली. विजेती घोषित केल्यावर दीपिका भावूक झाली होती. ‘Dignified लेडी’ म्हणून या सीझनमध्ये दीपिका ओळखली गेली. क्रिकेटर श्रीशांत या सीझनचा उपविजेता ठरला.

कोण आहे दीपिका कक्कर इब्राहिम?
– ‘ससुराल सिमर का’ या मालिकेतील ‘सिमर भाद्वाज’ या भूमिकेमुळे दीपिका घराघरात पोहोचली.
– त्यानंतर दीपिका ‘झलक दिखला जा’ कार्यक्रमाच्या आठव्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.
– जेपी दत्ता यांच्या ‘पल्टन’ सिनेमातून दीपिकाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 7 सप्टेंबर, 2018 रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला.
– त्यानंतर तिने बिग बॉसमध्ये सहभाग घेतला.