भय्यू महाराज आत्महत्या प्रकरण : विश्वासू सेवक विनायक दुधाळे पोलिसांच्या ताब्यात

भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणात त्यांचा विश्वासू सेवक विनायक दुधाळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भय्यू महाराज यांच्या आत्महत्येनंतर विनायक फरार होता. त्याच्या घरी पोलिसांनी चौकशीसाठी अनेकदा नोटीसही पाठवल्या होत्या, मात्र तो पोलिस ठाण्यात हजर नव्हता झाला. अखेर शुक्रवारी त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांनी यश आले.