भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 128वी जयंती, राष्ट्रपती, पंतप्रधानांसह दिग्गज नेत्यांनी दिल्या शुभेच्छा

एएम न्यूज नेटवर्क । भारतीय संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128व्या जयंतीनिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महामानवाच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे ट्विट

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विट

मोदींनी ट्विटमध्ये लिहिले- “संविधान निर्माता और सामाजिक न्याय के प्रणेता बाबासाहेब डॉ. भीमराव अम्बेडकर को उनकी जयंती पर सादर नमन। जय भीम!”

मुख्यमंत्र्यांचे ट्विट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन ट्विट करत महामानवाला अभिवादन केलं आहे. “देशाच्या सर्व समस्यांवरील उपाय म्हणजे भारतीय संविधान !
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ही भारताला सर्वोच्च देणगी!”

मुख्यमंत्र्यांचे दुसरे ट्विट

संविधानाचे निर्माते
समता-समानतेचे पितामह
समाजसुधारणेचे अग्रणी
प्रख्यात अर्थतज्ञ
थोर विचारवंत, विधिज्ञ
भारताचे एक महान सुपूत्र
आणि आपल्या सर्वांचे आदर्श
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांना जयंतीदिनी कोटी कोटी दंडवत !

विधान परिषदेेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे ट्विट

महाराष्ट्रातही सकाळपासूनच भीमजयंतीचा उत्साह पाहायला मिळत असून चैत्यभूमीवर भीमसागर उसळला आहे. पश्चिम रेल्वेने पूर्वी निश्चित केलेला मेगाब्लॉक आज जयंतीमुळे रद्द केला आहे. चैत्यभूमीवर राज्यभरातून येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांची गैरसोय होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.