बेस्टचा संप पाचव्या दिवशीही सुरूच, मुंबईकरांचे हाल

मुंबईकरांच्या सेवेसाठी खासगी बस रस्त्यावर

मुंबई | बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप पाचव्या दिवशीही सुरुच आहे. संपावर तोडगा काढण्यासाठी आतापर्यंत सर्व बैठका निष्फळ ठरल्या. मंत्रालयातील उच्चस्तरीय समितीची बैठक संपली आहे. या बैठकीतूनही तोडगा निघाला नाही. त्यामुळे संप शांततेच्या मार्गाने सुरुच राहणार असल्याचे कामगार नेते शशांक राव यांनी सांगितले. मुंबईकरांचे हाल होऊ नये, यासाठी स्कूल बस संघटना आणि मुंबई बस मालक संघटना धावून आली आहे. जवळपास दोन हजार खासगी बसेस मुंबईकरांच्या सेवेसाठी रस्त्यावर धावणार आहे. अशी माहिती स्कूल बस मालक संघटनेचे अनिल गर्ग यांनी दिली. दरम्यान, आजपासून महापालिकेचे सफाई कर्मचारीही संपात सहभागी होणार आहेत. अखिल भारतीय बंदर आणि गोदी कामगार संघटनेनेही या संपाला पाठिंबा दिलाय.