बीडच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना 5 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले

FILE IMAGE

बीड | जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी बी. एम. कांबळे यांना 5 लाख रूपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. कांबळे यांच्या शासकीय निवासस्थानावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. पुरवठा विभागातील चौकशीचा अहवाल सोयीस्करपणे देण्यासाठी त्यांनी लाच मागितली होती. याप्रकरणी त्यांना ताब्यात घेण्यात आले असून या घटनेने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.