मिताली राजसोबतच्या वादाचा रमेश पोवार यांना फटका, मागावले प्रशिक्षकपदाचे अर्ज

नवी दिल्ली – भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजसोबतच्या वादाचा फटका रमोश पोवारयांना बसला. बीसीसीआयने भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचे अर्ज मागविले आहेत. बीसीसीआयने रमेश पोवार सोबत प्रशिक्षकपदाचा 30 नोव्हेंबरचा करार केला होता. तो पुढे वाढवण्यात येईल अशी र्चचा काहीदिवसांपूर्वी होती. मात्र मिताली सोबतच्या वादानंतर हा करार वाढवण्यात आला नाही.

रमेश पोवार यांच्या आधी तुषार आरोठे हे भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. मात्र, आरोठे यांचे ही सीनियर माहिला खेळाडूसोबत वाद निर्माण झाले. त्यानंतर पोवारची प्रशिक्षकपदावर नेमणूक करण्यात आली होती. मात्र 20-20 वर्ल्ड कपच्या उपांत्य लढतीत मिताली राजला वगळे आणि त्या दोघांचा वाद सुरू झाला.

त्यानंतर रमेश पोवार आणि मिताली राज यांनी अकमेकांवर आरोप केले. हा वाद आणखी टोकाला जाऊ नये यासाठी बीसीसीआयने प्रशिक्षकपदासाछी नव्याने अर्ज मागावले आहेत. तर, प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत टॉम मुडी, डेव्ह व्हॉटरमोर आणि वॅकटेश प्रसाद हे खेळाडू प्रशिक्षकपदाचा शर्यतीत आहेत.