मोदींच्या पत्नी जशोदाबेनची भूमिका साकारणार ही अभिनेत्री, शिकतेय गुजराती भाषा

मुंबई. बॉलिवूडमध्ये सध्या एकापाठोपाठ एक बायोपिक तयार केले जात आहेत. नुकताच माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचा ‘अॅक्सीडेंटल प्रायमिनिस्टर’ हा बायोपिक रिलीज झाला. यानंतर बाळासाहेब ठाकरे यांचा ‘ठाकरे’ सिनेमा रिलीज झाला. राहुल गांधी यांच्या आयुष्यावर आधारित ‘माय नेम इज रागा’ सिनेमाचा टिझरही रिलीज झाला आहे. यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. चित्रपाटाची घोषणा झाली आहे. मोदींच्या भूमिकेत विवेक ओबेरॉय दिसतोय. आता या सिनेमासंबंधीत नवी माहिती समोर आली आहे. पंतप्रधानांच्या पत्नी जशोदाबेन यांच्या भूमिकेत प्रसिध्द अभिनेत्री बरखा बिष्ट सेनगुप्ता दिसणार आहे. सूत्रांनुसार या सिनेमाची तयारी सुरु झाली आहे. अहमदाबादमध्ये लवकरच सिनेमाची शूटिंग सुरु होणार अशी माहिती आहे.

जशोदाबेन यांची भूमिका यांचे पात्र साकारण्यासाठी बरखा सेन गुप्ता तयारी करतेय. ती विविध पुस्तक वाचतेय. बरखा म्हणाली की, ‘जशोदाबेन यांची भूमिका माझ्यासाठी खुप चॅलेंजिंग आहे. अहमदाबाद माझ्यासाठी नवे नाही. माझे पती इंद्रनील अहमदाबादचे आहेत. या शहराशी माझा जवळचा संबंध आहे. मला फक्त गुजराती भाषेवर काम करण्याची गरज आहे.’