बाळासाहेब ठाकरेंपेक्षा मोठा स्टार नाही : अभिनेता आमिर खान

मुंबई | महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंपेक्षा मोठा स्टार नाही, असे विधान अभिनेता आमिर खानने केले आहे. 25 जानेवारीला ‘ठाकरे’ सिनेमा प्रदर्शित होत आहे. त्यामुळे ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित होताना कोणत्याही निर्मात्याला त्यावेळी आपला चित्रपट प्रदर्शित करावासा वाटणार नाही, असेही आमिर खानने म्हटले आहे.

‘चीट इंडिया’ची रिलीज डेट बदलली

ठाकरे सिनेमा येत्या 25 जानेवारीला रिलीज होणार आहे. त्याच दिवशी इम्रान हाश्मीचा ‘चीट इंडिया’ रिलीज होणार होता. मात्र, हा चित्रपट 25 ऐवजी 18 जानेवारीलाच रिलीज करण्याचा निर्णय निर्माते भूषण कुमार यांनी घेतला आहे. मुंबईत एका पत्रकार परिषदेत ‘चिट इंडिया’च्या निर्मात्यांनी ही घोषणा केली.