बिग बी आणि तापसी पुन्हा एकदा एकत्र, ‘बदला’चा ट्रेलर रिलीज

मुंबई. महानायक अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. शाहरुख खानचे प्रोडक्शन हाऊस रेड चिली एंटरटेनमेंटच्या ‘बदला’ या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलर हा खुप उत्कंठा वाढवणारा आणि रहस्यमयी आहे. ‘बदला’ हा सिनेमा म्हणजे एक मर्डर मिस्ट्री आहे. यामध्ये अमिताभ बच्चन यांच्यावर ही मर्डर मिस्ट्री सोडवण्याची जबाबदारी आहे. ते यामध्ये एका अनुभवी वकिलाच्या भूमिकेत दिसत आहेत. तापसी पन्नूला अडचणीतून सोडवण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. अमिताभ बच्चन आणि तापसी हे दोघं ‘पिंक’ सिनेमातही एकत्र दिसले होते. यामध्येही अमिताभ बच्चन तापसीला अडचणीतून सोडवण्यासाठी प्रयत्न करत होते. पण ‘बदला’ या सिनेमाचा ट्रेलर हा खरोखरंच उत्कंठा वाढवणारा आहे. ट्रेलर पाहताना क्षणाक्षणाला मनात अनेक प्रश्न उपस्थित होत राहतात.

‘बदला’ या सिनेमात नैनाची कथा आहे. ती तिच्या प्रेमीच्या डेडबॉडीसोबत हॉटेलच्या बंदखोलीत आढळते. यानंतर तिच्या अडचणी सुरु होतात. या अडचणींतून बाहेर पडण्यासाठी ती प्रतिष्ठीत वकील बादल गुप्ता (अमिताभ बच्चन) ची मदत घेते.

‘बदला’ हा सिनेमा 216 मधील सुपरहिट स्पॅनिश सिनेमा ‘कॉन्ट्राटिएम्पो’चा रिमेक आहे. सुजॉय घोष यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 8 मार्चला हा सिनेमा चित्रपटगृहात दाखल होणार आहे.