अझीम प्रेमजी यांनी दान केले 52,750 कोटी रुपये, आतापर्यंत 145,00 कोटीचे केले आहे दान

0

बंगळुरू | आयटी दिग्गज आणि विप्रोचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांनी 52,750 कोटी रुपये बाजार मूल्याचे शेअर दान केले आहे. विप्रो लिमिटेड कंपनीच्या 34 टक्के भागीदारीची रक्कम त्यांनी दान केली आहे. त्यांच्या फाउंडेशनने पत्रक जारी करुन म्हटले आहे की, प्रेमजी यांच्याकडून आतापर्यंत एकूण 145,000 कोटींचे दान करण्यात आले आहे. हा विप्रो कंपनीचा 67 टक्के भाग आहे.

यासोबतच पत्रकात सांगितले आहे की ‘अझीम प्रेमजी यांनी आपल्या वयक्तिक संपत्तीचा जास्तीत जास्त त्याग करुन परोपकार दर्शवला आहे. यामुळे अझीम प्रेमजी फाउंडेशनच्या परोपकार कार्यांना सहयोग मिळेल’

फोर्बसने जगातील अरबपती लोकांची यादी नुकतीच जाहीर केली होती. यामध्ये अझीम प्रेमजी 22.6 अरब डॉलर संपत्तीचे मालक असल्याचे सांगितले होते. ते या यादीत 36 व्या स्थानी होते. तर भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानीही जगातील अरबपती लोकांच्या यादीमध्ये पुढे आहेत. फोर्ब्सच्या अरबपतींच्या यादीमध्ये ते 13 व्या स्थानी पोहोचले आहेत.