रोहितची शतकी खेळी व्यर्थ, ऑस्ट्रेलियाचा 34 धावांनी विजय

सिडनी | भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 5 बाद 288 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावांचा पाठलाग करतांना भारतीय संघाला 9 बाद 254 धावाच करता आल्या. भारताचा 34 धावांनी पराभव झालाय. अवघ्या चार धावांमध्येच 3 विकेट गमावणाऱ्या टीम इंडियासाठी रोहित शर्मा 133 आणि धोनीने 51 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. या 3 सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.