लोकपाल, लोकायुक्तसाठी अण्णांच उपोषण सूरू

भाजप सरकावर डागली तोफ

अहमदनगर | लोकपाल, लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी आणि शेतमालाला दीडपट हमीभाव मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथे उपोषण सुरू केले आहे. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. ‘या सरकारला भ्रष्टाचारमुक्त देश नको आहे. त्यामुळेच लोकपाल कायदा लागू केला जात नाही. तसंच हे आंधळे आणि बहिरे सरकार आहे. त्यांना शेतकऱ्यांचे हाल दिसत नाहीत. त्यांनी केवळ उद्योगपतींची चिंता आहे.’ असा हल्लाबोल अण्णांनी केला. ‘शरीरात प्राण असेपर्यंत लढत राहणार. ही लढाई ‘करेंगे या मरेंगे’ अशी असेल’, असा इशाराही अण्णांनी दिला.