अकोल्यात कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाची दगडाने ठेचून हत्या

अकोला | अकोल्यात रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. दहिहंडा पोलीस स्टेशन हद्दीतील दोनवाडा येथे कौटुंबीक वादावातून भावानेत भावाची हत्या केली. या प्रकरणी आरोपी भावाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.

दहिहंडा पोलीस स्टेशन हद्दीतील दोनवाडा बु येथील अंबादास सहारे व त्यांच्या भावामध्ये शनिवारी रात्री सायंकाळी सात वाजता काही कारणांमुळे वाद झाला. या वादातून अंबादास सहारे यांची त्यांच्या भावाने दगडाने ठेचुन हत्या केली. राहत्या घरी हा प्रकार घडला. या घटनेची माहिती दहिहंडा पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपी भावाला पोलिसांनी अटक केली आहे. निरंजनदास असे आरोपी भावाचे नाव आहे.